आमच्या ऊबदार चावडीवर गप्पांची मैफल म्हणजे 'अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदाराची'पाजळवित 'पिंडे पिंडे भिन्न मती , तुंडे तुंडे सरस्वती' द्वारे प्रत्येकजण आपल्या परिने जमेल तसे कोणत्याही विषयाची चिरफाड करतात, तेव्हा 'तीन ताड, नरसू मिलच भित्ताड' खदखदून हसल्याशिवाय रहात नाही . थंडी, वारा,पाऊस असो . सूर्य अस्ताला यायची खोटी की,आमच्या द्विपाद मित्र मंडळींची पाऊले कळत -नकळत शब्द बुड बुड्यांची देवाण घेवाण करण्याकरीता चावडी कडे वळतात . मैफिली मध्ये अनेक विषय निघतात. बहुतांशी प्रासंगिक स्वरूपाचे अधिक असतात .ते स्थानिक, विभागीय पातळीवरचे किंवा प्रसार माध्यमांनी दिलेले वृत्त असो .एखाद्या विषयाचा इतका किस काढला जातो कि, गुलाबी थंडीच्या मोसमात देखील आम्ही घामाघूम होतो .त्या दिवशी चा विषय होता 'वृद्धांचा'. चाळीत राहणारे रामदास बाबा पंचाहत्तरी पार केलेले 'जीवनाच्या पल्याड , अन मरणाच्या अल्याड ' मधल्या मध्ये झुल्यावर झुलणारी रामदास बाबां सारखी अनेक वृद्ध मंडळी आहेत . पण रामदास बाबांचे वेगळेच आपल्या कुटुंबांसाठी एखाद्या बैलाप्रमाणे राब राबले . कुटुंबांचा उदरनिर्वाह , मुलांचे शिक्षण खर्च कधीही जाणीव होऊ दिली नाही . बाबा आजारी असले तरी त्यांनी आपल्या कर्त्यव्य कर्मात कसर केली नाही . काम केल्याने व्याधी नष्ट होतात . हे ते नेहमी सांगत .आम्ही ताप आला तर आम्ही दोन तीन दिवस आडवे होतो .अगदी अलीकडे त्यांनी काम बंद केले होते उतार वयामुळे अंगातील धमक ,ताकद शीण झाली होती . जीवनात खूप काबाड कष्ट केले . चैतन्याने उसळणारे जीवन कधी ना प्रवाहाचा आवेग ओसरल्यानंतर हिंदळत राहणार . मुलगा चांगल्या ठिकाणी कामाला लागला तद्नंतर बाबांनी त्याचे शुभमंगल केले . मुलगी श्रीमंत घराण्यातील असल्यामुळे तिला आमच्या चाळीतल १० * १० चं घर तिला पसंत पडेना . कुरबुर वाढली भांड्याला भांड लागलं त्याचे पर्यावसान मुलाने घर सोडण्यात झाले . सासू सुनेचे पटेनासे झाल्याने मुलाने वेगळा संसार थाटला . तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला त्यांचा दिवटा चिरंजीव ..... घर सोडून वेगळा संसार थाटून राहू लागला. रामदास बाबा च्या मनात खदखदणारा उद्रेक एवढा तीव्र होता की, संताप, चीड , नाराजी त्यांच्या वागण्यातून दिसून येत होती .तितक्यात सहचारिणी अर्ध्यावरती संसार सोडून गेली .बायको गेली म्हणून त्यांनी एकाकी जीवन जगत त्यांची 'पिंजऱ्यात व्याघ्र सापडे,अन मुले – मुली मारिती खडे ' अशी अवस्था झाली होती . वाटलं होत आई गेल्या नंतर मुलगा बाबा कडे राहण्यास येईल
परंतु त्याने अलग राहणे पसंत केले .परंतु त्याने अलग राहणे पसंत केले .परंतु त्याने अलग राहणे पसंत केले . बाबा म्हणजे आयुष्याला त्रासलेले...एकटेपणाला कंटाळलेले.... वेदनाग्रस्त शेवटचे क्षण मोजीत पडलेला देह ... सारे शरीर आखडलेले.. लटपटत चालणे... दात पडलेले.... डोळ्यांनी दिसेना की, कानाने ऐकू येईना... तोंडातून लाळ गळत... काय सांगावे या वृद्धाचे जीणे..... अनेक उन्हाळे - पावसाळे पाहिलेल्या या अनुभवाच्या महासागराला जीवनाच्या अंतिम टप्यात इतक्या थपडा खाव्या लागतील हे त्यांना वाटलं देखी नसावंचिखलात रुतलेल्या हत्ती ला सर्वाधिक लज्जा या गोष्टीची वाटते की ,वाटेने जाणारे एक हरीण देखील त्या हत्तीच्या परिस्थितीवर हसत हसत पुढे जाते .संकटात सापडलेल्या हत्तीला हसावे हेहत्तीसाठी लाजिरवाणे दुसरे काय असेल ? रामदास बाबांचे बलदंड हत्ती प्रमाणे झाले होते . त्या दिवशी बाबांच्या घरी कोणी वकील महाशय आले होते. हयातीत भरपूर काही कमवून ठेवले होते . मृत्युनंतर आपली संपत्ती वृद्धाश्रामाला दान केली तसेच आपला देहाची आबाळ होऊ नये म्हणून देहदान करण्याचे लिहून दिले होते .गप्पांच्या ओघात रात्र फार झाली ..... असहाय्य झालेले बाबाची दु;खभरी कहाणी ऐकून मन सुन्न झाले .वाईट वाटले ......
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment