Saturday, September 8, 2018

राजाची तपश्चर्या फळाला येणार का.....!



एक होतं सफरचंद. झाडावरच मनसोक्त लटकत होतं. पिकून मग त्याला कुणी उतरवणार होतं. पानं सळसळून खेळत होती त्याच्यासवे. वारा लबाड त्याच्या गालाशी लगट करून काहीतरी कुजबुजून गेला. सफरचंद खूप खूश होतं. रंगाने लालसरचवीला गोड,आकाराने मोठंच अगदी नेमकं सारं. आत्मविश्वासाने ओतप्रोत आनंदी सफरचंद. ज्या झाडाच्या फांदीवर होतं ते झाडच म्हणाले, "आता तू वेगळा होणार रे बाळा. त्यात तू काही आंब्याइतका गोड नाहीस. रसाळही नाहीस...तुझा आकारही आंब्यासारखा नाही. तू किती कमी पडतोयंस. तुला कोण विचारणार बाहेर पडल्यावर?" सफरचंदाने हे ऐकलं नि त्यात त्राणच उरले नाहीत. आपण इतके पिकलो ते चुकिचंच. कुणाच्याच हातात कसं नव्हतं हे... आपण कुठे चुकलोखूप प्रयत्न करूनही काहीच बदल होणं शक्य नव्हतं. त्याला स्वत:चाच राग येत होता. आत्मविश्वास ढासळला. त्याला केसरी रंगच हवा होता. स्वत:चा रंग नकोसा झाला होता. त्याला स्वत:त्या बियांचाही राग येत होताएकच मोठी बी असावी न पण....  उदास झालं ते सफरचंद. कोमेजून गेलं. नि स्वत:हूनच  झाडावरून गळून पडलं... ते सफरचंद म्हणजे  *श्री राज ठाकरे*.
 सोबत अनेक सफरचंदे हिरमुसली.गळून पडली.
       ठेचा तर वाटेत लागतातत्या पचवायची हिमंत कुणामध्ये असेल तर *श्री.राज ठाकरे.*                            
      कठीण प्रसंगात ज्यांनी साथ दिली त्या सहकाऱ्यांना किमंत देणारा नेता *श्री राज ठाकरे*
मुंबईत सत्तेसाठी हिंदुत्वाचा नारा दिला आणि मराठी माणूस मागे पडला. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या वल्गना मागे पडल्या.अशा वेळी मराठी माणसांना न्याय देणारा नेता शिल्लक नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ मार्च २००६  रोजी उदयास येऊन १२ वर्षे पूर्णे झाली. नुकताच १२ वा वर्धापन दिन साजरा झाला. महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांना सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे या पक्षाचे प्रमुख ध्येय. मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा हा पक्ष. महाराष्ट्रातील समस्यावर रस्त्यावर उतरणारा हा पक्ष. जे मराठीवर प्रेम करतात. जे जन्माने जरी अमराठी असतील पण महाराष्ट्रात राहून मराठीचा आदर करीत असतील, त्यांचा हा पक्ष. पण प्रचार वेगळा झाला. अमराठीविरोधी पक्ष म्हणून संभावना केली गेली. मुंबई मराठी माणसांची पण मुंबईतल्या दुकानावर मराठी पाट्या नव्हत्या. कायद्याच्या चौकटीत राहून त्या दुकानावर आल्या.  महाराष्ट्रातील टोलनाके म्हणजे महाराष्ट्राची लुबाडणूक करणारी शासनमान्य दुकाने.... त्या आंदोलनामुळे मनसेवर टीका झाली. पण किती टोलनाके बंद झाले, किती जनाच्या खिसेमारी थांबली, याचे मूल्यमापन कुणी केले नाही. आंदोलन झाले नसते तर आजपर्यंत ते टोलनाके सुव्यवस्थित सुरु राहिले असते. या आंदोलनातून फक्त मराठी माणसांना लाभ झाला, असे नव्हे तर त्या टोलभरून जाणारा सर्वभाषिकाचा लाभ झाला. रेल्वेभरती आंदोलनामुळे मराठी माणसे सेवेत आली. रझा अकादमीच्यावेळी पोलिसाना मनापासून पाठिंबा दिला गेला.
नाशिकचा  कायापालट झाला. तेथील जनतेला तो दिसला नाही पण पुण्याच्या महापौरांना दिसला अन त्या निव्वळ त्या कायापालट नाशिकचा अभ्यास करण्यासाठी नाशिकला गेल्या. एलफिस्टनची  दुर्घटना मनाला चटका लावून गेली. मरणारे फक्त मराठी नव्हते. पण महाराष्ट्रात राहणारा आपला माणूस अशा दुर्दैवीपणे मारला जातोय, याचे दु:ख मनसे अध्यक्षांना स्वस्थ बसू दिले नाही. रेल्वेस्थानकालगत  असणारे फेरीवाले केवळ अमराठीच नव्हते. मराठीपण  होते. त्या गर्दीला बाजूला सारून मोकळी वाट करून देणारा श्री राज ठाकरे.
            गेली बारा वर्षे मराठी भाषिकांसाठी झुंजत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास नवे धोरण राबविण्यासाठी झटत आहे. मराठी राजभाषादिन हा राज ठाकरेंमुळे महाराष्ट्रात साजरा होऊ लागला. तरीही मराठी भाषिक मनसेला पसंत का करीत नाहीत...? हा प्रश्न सर्वाधिक अमराठी माणसांना अधिक पडतो. ते चेष्टेने मराठी माणसांची खिल्ली उडविताना म्हणतात देखील, मराठी माणसेच बरोबर राहत नाहीत तो पक्ष कसा डोलारा सांभाळणार.....! त्यांची खिल्ली उडविणारी भाषा वेगळी असते. पण एक विचार करा, मुंबईतील मराठी माणूस मनसेच्या सोबत का नाही...? कुठे कमी पडताहेत. महाराष्ट्र सैनिक अनेक खर्चिक कार्यक्रम राबवितात. लोकांच्या मनात घर करतात. पण ते तात्पुरते स्वरूपाचे का असते...? मुळात मराठी माणूस हा राज ठाकरेंच्या मागे नाही. तो निवडणूक आली की, पैसे वाटणाऱ्या माणसांच्या मागे धावणारा मराठी माणूस म्हणून ओळखू लागला आहे. आपला स्वाभिमान विकणारा मराठी माणूस...! अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. राज ठाकरेविरोधी मतदान करण्यासाठी अमराठी एकत्र येतात. मराठी मुलुख म्हटले जाणाऱ्या माझगावच्या विधानसभा क्षेत्रातून एक मुस्लीम पक्षाचा आमदार निवडून येतो. कुणाच्या बळावर... त्यांचा मुसलमान समाज त्या आमदाराच्या पाठीशी उभा राहिला म्हणून. मराठी माणूस एकत्र आला तर काही  करू शकतो. या गमज्या कोणी मारीत असेल तर त्यांना मी एकच सांगू शकतो, *ते केवळ निवडणूक नसताना...!*
महाराष्ट्र सैनिकांना स्वमनाने एक पूल ओलांडता येत नाही. कित्येक रस्ते पार होतात. अनेक मोहिमा सर करतात. पण एक पूल असतो तो मात्र पार होत नाही. पलीकडून कुणी साद  देत नाही. म्हणून निराश होतात. म्हणतात मला जावंसं वाटतं. पावलं उचलली जातात. पण उचललेलं पाऊल पुढेच जातं असं नाही ना...!
(महासैनिक कामाला हात घालतात पण अर्ध्यावरच डाव मोडतात. त्यांच्याविषयी  थोडं मनातले)
                        गेली बारा वर्षे सुखाची कमी  आणि दु:खाची अधिक...! सोडून गेलेले बरेच सहकारी मुंबई महाराष्ट्रात मराठी पुंगी वाजवून काही मिळणार नाही, या अर्थाने सोडून गेले आहेत. सोडून गेलेल्यांचे सुखदु:ख नसावे. जर राज ठाकरेंनी मराठी मुद्यावर पाणी सोडले तर मराठी भाषा संवर्धन किंवा मराठी माणसांच्या गळचेपीवर बोलणार कोण...!  महाराष्ट्रात शासकीय निमशासकीय कार्यालये बँका, आयुर्विमा कार्यालयात उच्चपदावर बाहेरच्या राज्यातले आणून बसविले आहेत. जिकडे तिकडे अमराठी अधिकारी दिसतील. घोटाळ्याचे सूत्रधार तेच असतील पण सर्व आळ मात्र स्थानिक वर्गाच्या माथ्याशी मारून जातील. मराठीचा दबदबा हवा आहे. यासाठी राजाने बारा वर्षे तपश्चर्या केली आहे. सुख दु:खे पाहिली आहेत. तरीही एक प्रश्न मनात घोंघावत आहे, मराठी माणसे राजाला प्रसन्न होतील का....! त्याच्या तपश्चर्येचे फळ त्याला देतील का....!


अशोक भेके

No comments:

Post a Comment