ज्यांच्याकडे कौतुकाने, प्रेमाने, अतीव आदराने पाहतो ते संजय नाईक...
ज्यांच्याकडे
विचारांची तत्वांची भरभक्कम बैठक आहे ते संजय नाईक...
जे माणसाकडे एकाच खिडकीतून, एकाच कोनातून बघत
नाहीत ते संजय नाईक... माणसं समजून घेण्याची समज हि प्रगल्भ आहे ते संजय नाईक...
समाज
ढवळून टाकणारे नेतृत्व आहे ते संजय नाईक...*
संघटन कौशल्य कसं करावे,यांचे धडे ज्याच्याकडून
गिरविले जावेत ते
संजय नाईक...
दुसऱ्यांच्या मनात आत्मीयता निर्माण करणारे,
दुसऱ्याची कदर करणारे आणि आपला माणूस म्हणून काळजी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे
श्री. संजय नाईक...
मला
राजकीय विषयात रस नाही, पण माणूस म्हणून तरी सरस असलेले आमचे मित्र* श्री.
संजयभाई नाईक यांनी आज घोडपदेव समुहातून घेतलेली exit मनावर ओरखडा करून गेलीच पण.... दुपारी मला माहिती नसताना
इतरांनी कळविले. तो पर्यंत मला माहिती नव्हते. काय झाले... कुणास ठाऊक पण
आमच्याकडून कुठेतरी गल्लत झाली असावी म्हणून विचारणा करण्याचे धारिष्ट्य देखील
झाले नाही. ते का बाहेर पडले याचं कारण गुलदस्त्यात असले तरी ते या समूहात होते त्यांचा वेगळा बाज होता. या समूहात त्यांचे अस्तित्व आनंददायी होते. तरी
त्यांचे मत आहे. खरं तर मी आठवणीतील माणसं या विषयावर लिहिणार होतो.पण जसजशी
संध्याकाळ गडद होत गेली तसतशी चर्चेला उकळी फुटली. कुजबुज सुरु होणे म्हणजे चर्चा
सुरु झाली. मग चर्चेतील माणसं लिहायला घेतले. नाटकी वाटावं, खोटं वाटावं, बेगडी
वाटावं असा दूरस्थपणा मी माझ्या लेखणीतून उतरून देत नाही.
घोडपदेव समुह
एक वृक्ष असला तरी अनेक विचारांच्या फांद्या आहेत. काही फांद्या तजेलदार आहेत तर
काही अस्तित्व राखून आहेत. दिवसेंदिवस
जुनी पाने गळून नवी पालवी फुटते, वृक्ष बहरून जातो. फुले येतात, फळे येतात. या
वृक्षावर ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक समाजकारण या गुणांची जमाबेरीज येथे होत असते. समूहावर आलेले
वृत्त अनेकजन आवर्जून वाचायला मागतात किंवा आम्हाला शेअर करा, असे सांगतात तेव्हा
आपला समुह योग्यदिशा मार्गक्रमण करीत आहे, असे कुणालाही वाटेल.
घोडपदेव
समूहाबद्दल लिहिताना एक सांगू इच्छितो की, बीज जर एके ठिकाणी गाडून त्याचा वृक्ष कसा होईल, याकडे सूचकतेने
लक्ष देताना बीजाला हवेत उडू न देता त्या बीजापासून अंकुर कसा फुटेल आणि एका
बीजातून शेकडो फळे कशी निर्माण होतील, हे पाहिले आहे. येणारे येतात, राहतात आणि
काही गळफटून जातात. तरीही समूह नावारूपाला आहे. येथे शिस्तीचे पालन केले जाते.
अश्लीलतेला थारा नाही. मायभगिनी आहेत. त्या आपल्या सर्वांच्या विश्वासाखातर येथे
सदस्य बनून आहेत.
शब्द एकत्र
येतात आणि वाक्ये बनतात. फुले एकत्र आली तर पुष्पहार गुंफिले जातात. सूर एकत्र
येतात तेव्हा संगीत तयार होते.शेकडो हाडे एकत्र येतात तेव्हा हा देह तयार होतो.
त्या देहाना एकत्र आणण्याचे काम घोडपदेव समूहाने केले आहे. एकत्र राहू समाज,
लोकहितास्तव काहीतरी करू. उद्याची फिकीर करीत बसायचे नाही. आज जे करता येते ते आज
करून घ्यायचं.काही असतात नाठाळ, त्यांच्याकडे लक्ष न देता आपण चालत रहायचं, इतकेच
ठाऊक आहे आम्हांला....! चर्चा कोणत्याही विषयावर होऊ शकते. तिला सजवायचे धजवायचे
कसे.... हे कुणाला सांगणे न लगे.
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment