Saturday, September 8, 2018

शिवलेपाटील


पुण्याजवळ असलेले भीमा , भाम आणि इंद्रायणी या त्रिसंगमावर वसलेले आणि ऐतिहाासिक वारसा लाभलेले गाव तुळापुर, वढू त्याचं नाव. शहरात तेथील शिवले पाटील नावाचं एक हिंदू मराठा राहत होता. गरीब कुटुंब. शेतीवर भागेना म्हणून मिळेल ती कामे मिळेल ती मिळेल ती करून गुजराण करीत असे. पुणे शहरात असेच एके दिवशी त्यांना एका धर्मसंस्थेमध्ये नोकरी मिळाली . धर्म संस्था म्हणजे धर्म प्रसारासाठी स्थापन केलेली होती स्वेच्छेने कोणी धर्म स्वीकारनार्यांसाठी होती. शिवले-पाटलांनी प्रामाणिक पणे काम करून लवकरच त्यांचे नाव सर्वांच्या मुखोद्गत झाले अविरत श्रमाने त्याचा आंतरिक भाव पूर्णविकसित कमळाप्रमाणे फुलला … बहरला होता. घरात दाणा अडका येऊ लागल्यामुळे आई वडील खुश होते धर्मसंस्थेत कुणाचेही काम बिनबोभाटपणे, तत्परतेने शिवले पाटील करीत होते. सर्व कर्मचारी त्यांचा आदर करीत होते. काही दुखले सवरले तरी आस्थेवाइकतेने चौकशी करीत . मदतही करीत. अगदी बरं चाललं होतं. काही वर्षं आनंदात गेली असतील तर नव्यानं आलेल्या धर्मसंस्था प्रमुख म्हणजे बोलनं . गोड गोड बोलून काम करून घेणारा. संस्थेमध्ये मध्ये सारे आपल्या धर्माचे अन हा एक हिंदू मोहक या गोतावळ्यात कसा …? त्यांना या हिंदू असलेल्या माणसाचं या संस्थेमध्ये मध्ये काम करणं पटलं नाही. त्याने देखील संस्थेमध्ये मध्ये केवळ आपल्याच धर्माचे लोक हवेत असा फतवाच काढला. संस्था प्रमुख हा एक शिस्तप्रिय माणूस
बहुतांशी कर्मचार्यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता परंतु त्यांच्यासमोर बोलायचं कोणी …? शिवले पाटील यांच्यावर कळत नकळत धर्मप्रसारक महोदय आमचा धर्म स्वीकारणे विषयी दबाव टाकू लागले. वेगवेगळी आमिषे दाखवली. लग्न करून देऊ … राहायला घर देऊ … पगारपाणी योग्य रीत्या दिले जाईल. शिवले पाटील नी त्यांना सरळ सरळ नकार दिला.प्रमुख मनातल्या मनात फार चिडला होता. परंतु घाईघाईने निर्णय घेण्यात अर्थ नाही, म्हणून गप्प बसला. परंतु त्यांचे आंतरिक मन मात्र गप्प बसून देत नव्हते. शिवले पाटील म्हणजे लोहचुंबक … त्यांचा धर्म लोखंडावर चिखल साठावा त्याप्रमाणे होता. चिखलाकडे कोण आकर्षित होईल. त्यात शिवलेपाटील लोहचुंबक असले तरी ते चिखलयुक्त लोखंड आकर्षित करीत नव्हते. कोटीकोटी विषय सुखांची खिरापत मिळूनही हा हिंदू गडी बधेना …. सर्वाना आश्चर्य वाटले. अखेर संस्था प्रमुख जिद्दीला पेटले. काही करून ह्या माणसाला येथून घालवायचा. शिवले पाटीलानी देखील आपला भार कुलदेवतेवर टाकून निर्धास्त झाले खरे …!! पण त्यांची अवस्था डोंगरावर झोपडी बांधून राहावं अन सोसाट्याच्या वाऱ्याने झोपडीला डळमळीत करावं, अशी झाली होती. अत्यंत व्याकुळ अंत:करण झाले होते . पण हिंदू गडी… एक घाव अन शंभर तुकडे करणारांची औलाद … चेहऱ्यावर लवलेश नव्हता, चिंता नव्हती. दैवी भावभावनांच्या कचाट्यात भरडला होता. अखेर प्रमुखाने महोदयाने जाच सुरु केला. काहीही करून तो स्वत: काम सोडून गेला पाहिजे. त्याला काम करण्यास मज्जाव केला गेला . तरीही तो चर्च मध्ये वेळेवर जात येत असे. असे करता करता चार महिने लोटले. पगार नव्हता. गुजराण करण्यात अडथळा निर्माण झाला.
धर्म संस्थेत मधील इतरांना संस्था प्रमुख माघार घेईल किंवा शिवले पाटील माघार घेतील,असं सर्वाना वाटत होतं. पण माघार घेईल तो शिवले पाटील कसला ….! कुठेतरी अद्दल शिकवावी या उद्देशाने शिवले पाटील स्थानिक जे हिंदू धर्म नेते होते त्यांच्या कडे आपली फिर्याद घेऊन गेले . फिर्याद कथन केल्यानंतर मात्र त्या नेत्याने आपल्या कानावर हात ठेऊन "नको रे बाबा अन्य धर्माशी पंगा … त्यांच्याशी पंगा घेऊन माझी मते घालवायची का …? शिवले पाटलांना सरळ नकार देऊन बोळवण केली. हिरमुसलेल्या त्या गड्यानं हाय खाल्ली नाही. धर्म भावनांच्या जोरावर स्वविकास होताच त्यांची मानवी दुर्बलता आणि स्वाभाविक दोष आपोआप झडून पडतात. गपगुमान परतला याचं उदाहरण या देही … या डोळा दिसून आले हिंदू हा सापासारखा आहे. दातात विष आहे पण स्वत: जेव्हा खातो त्याला काहीच होत नाही. पण जर त्याच्या शेपटीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला तर मात्र डंख मारल्याशिवाय गप्प बसत नाही. शिवले पाटलाच्या शेपटीवर धर्मप्रमुख महोदयांनी पाय देण्याचा प्रयत्न चालविला होता . शिवले पाटील ही डंख मारण्याच्या बेतात होते. पण त्यांची कुवत तितकी नव्हती
असेच एके दिवशी एका असाधारण तेजोमय अलौकिक हिंदू नेत्याचे शहरात आगमन झाले. वार्ता कानी पडताच शिवले पाटील रस्ता शोधीत शोधीत दर्शनाला गेले. दर्शनाने अत्यंत प्रभावित झाले अन आपले आत्म निवेदन त्यांच्या समोर प्रकट केले . ऐकून मात्र युगधर्म प्रचारकाला अगदी गलबलून आले. आपणच हिंदू असल्याचा डंका मिरवितो त्या पेक्षाही घराघरात हिंदू अभिमानाने जगतो आहे, याच कारणाने त्या धर्म प्रचारकाची छाती फुगली. शिवले पाटील त्यांच्याकडे व्याकुळ नजरेने आपली तृष्णा भागविल म्हणून पाहत होतेच. धर्म प्रचारकाने आपले नाव असलेले कार्ड त्याला देऊन ते धर्मप्रमुखाला द्यावयास सांगितले. शिवले पाटील सारखा रांगडा गाडी या कार्डाने काय होनार…. ? साहेब….. कार्डाला संस्था प्रमुख केराची टोपली दाखवील ….! एकदा कार्ड त्यांच्या हातात देऊन तर बघ …. ! पाहू नंतर काय करायचं …! शिवले पाटील दुसऱ्या दिवशी संस्था प्रमुख महोदयासमोर उभे ठाकले अन ते कार्ड त्यांच्या हातात दिले. ते कार्ड पाहून संस्थाप्रमुख हडबडले . प्रकरणाला वेगळं वळण लागणार बहुतेक असं म्हणत सारीपटावरील घोड्याने पाऊल मागे घ्यावं अगदी तसं केले. लगोलग चार महिन्यांचा पगार दिला अन कामावर तातडीने रुजू करून घेतले. काय चमत्कार झाला देव जाणे ….याच विचाराने शिवले पाटील विचारांच्या महासागरात पोहत होते. पाषाणमय संस्था प्रमुख एक कार्ड पाहूनच पुरता बावचळला . शिवले पाटील ……… कृपा करून या पुढे कुणाकडेही जाऊ नका, म्हणून विनवणी केली. शिवले पाटीलही विचारशृंखलेतून बाहेर येत आपली मुंडी हलवून होकार घंटा बडवून गेले. एक हिंदू धर्म प्रसारक … त्याचं केवळ कार्ड पाहून हे धर्म प्रसारक हडबडतात.संस्था प्रमुख ज्या आवेगाने उसळला होता त्याच वेगाने शांत झाल्याचे पाहून धर्म प्रवर्तकाना 'किमयागार अवलिया' म्हटले तर वावगे ठरणार नाही, असं शिवले पाटीलांच्या मनात आले.
दुसऱ्या दिवशी त्या तेजोपुंज असामीला सारी आनंदकथा सांगण्यासाठी मुक्कामठिकाणी पोहचले. आनंदात त्यांनी इत्यंभूत मनातले न सांगता जसंच्या तसं अगदी सांगितले. त्यांना त्याचं काहीही वाटले नाही परंतु त्यांनी त्यांच्या मनात खळबळ करणारा प्रश्न त्याला विचारला 'अरे,तू ते तुला इतके सारे काही देत असताना तू हिंदू धर्म का करीत बसला …….? त्यांचा धर्म स्वीकारला असता तर तुझे कष्ट,दारिन्द्र्य मिटले असते.
त्यावर शिवले पाटील म्हणाले … साहेब, माझे नाव शिवले पाटील का पडले हे आपणास ठाऊक नाही . औरंगजेबाने संभाजी राजांचा वध ज्या ठिकाणी केला त्या गावाचे आम्ही. . ज्या गावात राजांचे रक्त सांडले त्या गावचे आम्ही. जो पर्यंत जीवात जीव होता तो पर्यंत संभाजी राजें औरंगजेबाच्या लालुचीला बधले नाहीत. तो एक हिंदू राजा आमच्या रानावनात इतके छल कपात करूनही यवनांच्या मोहाला बळी पडला नाही. अखेर औरंगजेबाने संभाजी राजांना क्रूरतेने मारून त्या पंचक्रोशीत आमच्या राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करून रानोरानी टाकले . तेव्हा आमच्या पूर्वजानी रात्रीच्या अंधारात जमा होऊन आपल्या राजाची दुर्दशा पाहवली नाही. चिरेबंदी वाड्यात गावकरी जमले होते. राजावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून चर्चा सुरु झाली . काही जणांनी काढता पाय घेतला केवळ आपली वाताहत औरंजेब अशीच करील. पण काही जन रानीवनी जाऊन राजांचे अवयव जमा करून आणले अन ते शिऊन धड बनवून त्यावर अंत्यसंस्कार केले त्यामुळे आमचे नाव शिवले पाटील आहे तर त्यानी हात असून पळ काढला त्यांचे नाव थोटे पाटील आहे. ते ऐकून हिंदू धर्म प्रसारक अवाक झाले अन उठून अत्यंत विनम्रतेने शिवले पाटलांना नमस्कार केला. शिवले -पाटील आपण आहात म्हणून हिंदू धर्म फोफावत चालला आहे.

*अशोक भेके*

No comments:

Post a Comment