काही पालक आले होते. आपली कैफियत
सांगायला. ऐकून मात्र दरदरून घाम फुटला. आम्ही सामाजिक गप्पा मारतो. हे केले, ते
केले किती आत्मविश्वासाने सांगतो. पण त्या पालकांनी सांगितले अन आपण कार्यकर्ते
अजून शून्यातच आहोत. काय चालले आहे. आपणास काहीच ठाऊक नाही.
बाबासाहेब आंबेडकर रोड जयहिंद सिनेमाच्या समोरून
चिंचपोकळी स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावीकडे असलेल्या रेल्वेच्या मोकळ्या
भूभागावर सध्या काय चालले आहे...? कोणी सांगेल का...! या मोकळ्या भूभागाला चकरा
अशा नावाने ओळखले जाते. सांगायलाच हवं आपल्याला...! या चकरात गांजा विकला जात आहे.
१०० रुपयाला एक पुडी दिली जाते. या परिसरात अंमली पदार्थांचे व्यापारी केंद्र
निर्माण झाले आहे. ती पुडी घेणारे कोण
आहेत.....! घरी कॉलेजला जातो सांगून काही मुले या ठिकाणी आढळतात. ती घोडपदेव
फेरबंदर काळाचौकी परिसरातील १५ ते २० वर्षे वयोगटातील आहेत. ती गांजासेवनाच्या
अधीन होऊ लागली आहेत. आपला मुलगा कॉलेजला जातो त्यामुळे आपली जबाबदारी संपली असे
समजू नका...! सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी या मोकळ्या भूभागाकडे फिरकून
पहा....! या व्यसनाच्या अधीन आपला मुलगा तर नाही ना....! पालकांना विनंती आहे.
गांजा हे व्यसन मुलांचे आयुष्य बिघडविणारे आहे. दीर्घकाळ सेवन केल्याने फुफ्फुसे
आणि हृदयावर विपरीत परिणाम होत असतो. या गांजेकस मुलांना वेळीच चाप लावण्यात
पालकांनी जागे झाले पाहिजे.
गांजा ही एक आयुर्वेदिक वान्स्पती आहे पण अंमली पदार्थ
आहे याने नशा आणि व्यसनाधीन माणूस होतो.चिलीमित गांजा भरून धुम्रपान केल्याने
वेगळ्याच जगात वावरू लागतो.
मध्यंतरी मस्जिद आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानक
दरम्यान रूळालगत दोन गांजाची झाडे कोणी तरी लावली होती. जाता येताना त्यांचा वास
येत असे. पण गांजासेवन करणारे रूळालगत असायचे त्यामुळे थोडे दिवस दुर्लक्ष केले पण
एक ज्येष्ठ माणसाबरोबर प्रवास करीत असताना त्याने सांगितले येथे दोन झाडे आहेत
त्याचा हा वास आहे...! दुसऱ्यादिवशी रेल्वेप्रशासनाला जागे केले तेव्हा ती झाडे
मुळासकट उखडून काढली गेली.
खरं तर असे धंदे आपल्या सर्वसामान्य वस्तीत करू देणे
बरोबर नाही. कुठेतरी कुणीतरी आळा घालायला हवा. नाहीतर भविष्यात आपलीच मुले जर
व्यसनाधीन झाली तर नशिबाला दोष देत राहण्यापेक्षा आपल्या मुलांची आजच काळजी घेतली
तर इष्ट ठरेल.
आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांचे आरोग्य
अबाधित राखण्यासाठी अशा अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी सावधानता
बाळगावीच पण सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपल्या तरुण मुलांसाठी अपेक्षित कार्य
करावे ही नम्र विनंती....!
या समूहात मातब्बर नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते
आहेत.पक्षभेद विसरून व्यसनाच्या वाटेवर जात असलेल्या तरुण पिढीला वाचविण्यासाठी
धडपड करा
अशोक भेके
घोडपदेव समूह
No comments:
Post a Comment