Saturday, September 22, 2018

आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . . . . . .

YOUTUBE





जूनी माणसं किती गोड, अन चिवट असत. यावरून मला आज प्रकर्षाने मधु शेट्ये यांची खूप खूप आठवण येऊ लागली. हा माणूसच तसा होता. आम्हाला सोडुन गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही आमच्या सोबत आहेत असेच वाटते.कुठून तरी आपली कापडी पिशवी हलवित हलवित येईल असं राहून राहून वाटतं. 
पण मधु शेट्ये म्हटले तरी डोळ्यात टचकन अश्रू दाटून येतात. साचणार्या आसवांना वाट मोकळी करावी यासाठी आठवणीतील माणसं कै. मधु शेट्ये यांच्यासाठी दोन शब्द........

मधु शेट्ये म्हणजे वरिष्ठ असले तरी मात्र मी मोठा आणि तु छोटा हा भेदभाव कधीही जोपासला नाही. त्यांच्या हसण्यात आत्मियता, विश्वास आणि दिलासा दिसे त्यामुळे समोरचा माणूस त्यांच्या साध्या हसण्याने तृप्त होत असे. आपण लहाण होऊन समोरच्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारा त्यांचा स्वभाव. लहान मुलांबरोबर कॅरम खेळताना कोणी चिटींग केली तर लहान मुलांप्रमाणे भांडण करणारी बाल्यावस्था जोपासली होती. आम्ही भुवईची भाषा यांजकडून शिकलो. गोपनिय मसले ते नेहमी भुवईनी बोलायचे आम्ही तर डोळ्यांनी प्रतिसाद देत होतो. 
वाटले नव्हते इतक्या लवकर ते मार्गस्थ होतील.मृत्युशय्येवर चिवट झुंज देत देत साखरेपेक्षा गोड असणार्या या सुस्वभावी माणसाने एक दिवस कोरड्या ठाक वाटणार्या बटबटीत डोळ्यात उतरून आलेला ओलावा निरोप घेत घेत एका वळणावरती थांबला. अखेरचा तो दिवस ....... मुंबई पोर्ट ट्रस्ट रूग्णालयात मी त्यांच्याजवळ उभा होतो. शेवटचे ते काही क्षण ....... त्यांच्या पायातील भळभळणार्या जखमांना औषधाने धुत्कारले होते. कुटुंब औदासिन सावटाखाली खिन्न होऊन मृत्युंजय मंत्र जपत बाहेर बसले होते. 

इकडे शरीर हळूहळू शिथिल होत चालले होते. अगदी चेतनाहीन..... डोळ्यांत हालचाल मंदावलेली असली तरी माझ्याकडे एकटक पाहत होते . डोळे बोलत नसले तरी भुवया काही तरी सांगत होत्या माझं मलाच गहिवरून आले. कितीतरी सखे सोबती सोडून गेले पण अश्रूनी कधी डोळे पाणावलेले नव्हते पण या निपचित पडलेल्या मधु शेट्येंनी माझ्यातल्या गंगा यमुनांना पूर आणला होता. त्याक्षणी त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याऐवजी मलाच सावरण्याचा प्रयत्न झाला. असे आपले मधु शेट्ये............



अशोक भेके 

राणीबाग प्रश्नावर आंदोलन करण्याची गरज....!



बरेच दिवस मी स्थानिक लोकसमस्येवर लिहायचे टाळत होतो. मतभेद होत होते ते म्हणजे आधणातले रडायचे अन सुपातले हसायचे....! शेवटी मीच माझ्या मनाला आवर घातला. पण आज राणीबाग या प्रश्नावर अनेक मंडळीनी माझे डोके भंडावून सोडल्यामुळे आज या  विषयावर लिहायला घेतले.
१.   महापालिका प्रशासनाने पर्यटकांवर प्रवेशमूल्य वाढविले आणि कमी केले.
२.   प्रभातफेरी साठी प्रवेश मूल्य पाचपटीने म्हणजे मासिक १५० रुपये वाढविले. ( पर्यटकांचे कमी केले पण प्रभातफेरी नागरिकांना दिलासा का नाही...! )
३.   प्रभातफेरीसाठी आठवड्यातून बुधवार या दिवशी राणीबाग बंद ठेवण्यात आला.( बुधवारी बाग परिसरात वाहनाची येजा चालते का..! )
४.   शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा मार्ग रोखला गेला. ( भायखळा येथे जाणारे येणारे शालेय विद्यार्थी यांचा मार्ग रोखून प्रशासनाने काय मिळविले)

असे अनेक विषय घडत गेले पण आम्ही मुग गिळून गप्प बसलो. मुळात घोडपदेव समूहाने राणीबाग या विषयावर अनेकदा लिहिल्यानंतर त्यामध्ये सुधारणांचे पाऊल उमटले गेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह बंदिस्त अवस्थेत उभारण्याचे काम सुरु आहे. आज महापलिका प्रशासनाने उत्तरेकडील छोटासा दरवाजा आजपासून बंद करण्यात केला.
कुणी सांगितले....?
वरून ऑर्डर आहे ...! हे उत्तर मिळाले
असा कोण वर आहे...! तो आमच्या घोडपदेव नारळवाडी फेरबंदर भागातील नागरिकांच्या मुळावर उठला आहे. प्रभातफेरी साठी अनेक मान्यवर या बागेत उपस्थित असतात. अनेक वृध्द माय बाप मंडळी  कसरत करीत असतात. विविध वनस्पती आहेत त्या मोकळ्या वातावरणात  शुध्द हवेचा लाभ घेतात. कसं ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे या बागेत अर्धांगवायू आणि मधुमेहाचे आणि vertigo याचे रुग्ण येतात. डॉक्टरांचा सल्ला त्यांनी मोकळ्या वातावरणात चालावे. जितके चालाल तितके बरे वाटेल म्हणून वेड्यासारखी आशा सुटेना, अन देव भेटेना म्हणून आपले आयुष्य वाढविण्यासाठी चालतात. चालताना धडपडतात,पडतात. आज त्यांना हा बंद दरवाजा सांगतोय ‘तुमचे अच्छे दिन सुरु झाले आहेत...!’ पश्चिमेच्या मुख्य प्रवेशद्वारातून फक्त प्रवेश मिळेल. कोण घडवून आणत आहे हे सारे....! आमच्या नागरिकांना त्रास देऊन काय मिळत आहे, समजत नाही. कोण अधिकारी आहे....त्याने खुंट्याची सोडून झाडाला बांधली आहे. वरून सोज्वळ असतील पण आतल्या सावळ्या गोंधळाची कल्पना आम्हाला देखील आहे.
   हा बंद दरवाजा आमच्या विभागीय नागरिकांना कायम सुरु राहिलाच पाहिजे.... तसेच  बंद बुधवार हा पर्यटकांसाठी ठीक आहे पण प्रभातफेरी नागरिकांसाठी नको. हे लक्षात घ्यायला हवे अन्यथा......स्थानिक नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका.


अशोक भेके
घोडपदेव समूह


आठवणीतील माणसं : अशोक बाजीराव चोरगे






२२ नोव्हेंबर १९८०.... संध्याकाळचे सहा वाजले होते... तितक्यात हृदय पिळवटून काढणारी घटना कानावर येऊन आदळली अन ज्वालामुखीचा स्फोट होत आहे, असेच जाणवू लागले. ओठ थरथरत होते. मेंदू सुन्न झाला होता. काही कळत नव्हते. दादर स्थानकात *अशोक चोरगे* उतरत असताना त्या गर्दीत श्वास कोंडल्याने त्याचा अंत झाला. हि घटना ऐकली अन पायाखालची जमीन हादरली. धरणीकंप झाल्यासारखे वाटले. 
आमच्यातला एक मनमिळाऊ स्वभावाचा....
देवाच्या बागेतील कळ्या म्हणजे लहान मुलांवर प्रेम करणारा, त्यांना फुलविणारा....
मुलांच्या ओसाड मनोभूमीवर सहृदय मेघांचा वर्षाव करणारा...
*आमचा मित्र अशोक चोरगे*
त्याची मैत्री म्हणजे सृजनशील विचारांची, सधन संस्काराची साक्ष देणारी होती. समाजसेवक नव्हता कि राजकारणी नव्हता. अशोक चोरगे म्हणजे खरा हिरा होता. नियतीने त्याच्यावर घाला घातला होता. अवघे वयाची पंचविशी पूर्ण करण्याआधीच जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला.... यापुढे काय म्हणावे. हि घटना घडल्यानंतर चोरगे कुटुंबीय अनेक वर्षे सावरू शकले नाही.
मुंबई घोडपदेव मधल्या कांचवाला चाळीतील ते छोटेसे घर, मोजून फक्त ८० चौ. फुट. त्या घरात संसार थाटलेल्या *सौ आणि श्री बाजीराव चोरगे* यांना दिनांक १५ नोव्हेंबर १९५६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंदीआनंद झाला. जे कर्म चांगले करतात त्यांना फळ मिळते ते या बाळाच्या रूपातून चोरगे कुटुंबियांना मिळाले होते. प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज शिक्षण येथेच पूर्ण झाले. शालांत परीक्षेत त्यावेळी ६४% गुण मिळवून विभागात प्रथम आला होता कॉटनग्रीन त्या दिव्याखाली अभ्यास करून Bsc Chemistry मध्ये first class ने उत्तीर्ण झाले, त्यावेळेस विभागात काही ठराविकच पदवीधर झालेले होते. पदवीधर झाल्यानंतर अनेक कंपन्यांची चालून नोकरीसाठी निमंत्रणे आली. मुंबई महानगरपालिकेत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले होते. चोरगे कुटुंबियांच्या नशिबात असं काय मांडून ठेवले होते कि सुख पाहता लोचनी....पण नियतीला हे मान्य नव्हते..!
एक किस्सा सांगायचा म्हणजे तेव्हा अकरावी म्हणजे SSC होती. एक समाजसेवक सतत या परीक्षेला बसत पण नापास होत असत. त्यांच्या पास होण्याने त्यांना अत्यंत लाभ होणार होता. तेव्हा त्यांनी माझ्या मित्राला गळ घातली. पण ती मागणी झिडकारली. समाजसेवक देखील येता-जाता मारक्या म्हशीसारखा त्याच्याकडे बघत असे. पण प्रामाणिक माणसाला कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणाऱ्या आमच्या मित्राला भीती नव्हती.
अंगकांती निमगोरी, अतिउंचही नाही आणि अल्पउंची नाही अत्यंत प्रमाणबध्द शरीर. केस काळे आणि मागे फिरविलेले, सरळ नाक तेही बाकदार, ओठ लाल आणि पातळ, पेहराव म्हणजे साधी विजार आणि शर्ट... सतत हसतमुख चेहरा खळाळून हसताना उमटणारी भावमुद्रा म्हणजेच विनम्र भावमुद्रा.. जणू देवाने कलेचा नमुना निर्माण केला असल्याचे वाटत असे. संवादाला कधीच नकार न देणार्यात आणि संवादातून कायमच समाजहितकारक बुद्धिवादी भूमिका पटवून देण्याची असामान्य क्षमता बाळगणार्या‍ मित्राचे अकस्मात जाणे. खरोखर दुर्दैवी होते. आजही आठवणीचे मनोरे उभे केले तर सर्वप्रथम या मित्राला स्थान मिळते. हिऱ्याला घणाच्या घावाने इजा होत नाही. आज अशोक आपल्यात नसला तरी त्याचे मोल आजही आमच्या मनामनात घर करून आहे. 


अशोक भेके

Sunday, September 16, 2018

कार्यकर्ता येणार का आपल्या घरी.....?


मी नेहमी अनेक विषयावर लिहितो, तेव्हा कायम टीकात्मक लिहितो असा काहींचा आक्षेप आहे. कोणी म्हणतं मला नकारात्मक दिसतं. पण माझे प्रांजळ मत सांगतो,लिहिताना मी कुणा एकाला लक्ष्य करत नाही. सुचलं की लिहितो. सोशल मिडियावर म्हणजे फेसबुक अथवा व्हाटसअप वर काही दिवसापूर्वी घरघंटी आणि शिलाई मशीन स्वयंरोजगारासाठी महिलांसाठी शासकीय अथवा पालिकेच्या विविध योजनांच्या जाहिराती पोस्ट केल्या, अन आपल्या जबाबदारीचा गाशा गुंडाळला. आपल्या विभागात किती लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात याचा कोणी ठाव घेत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी केवळ एक गरजू महिलेला या योजनांचे लाभार्थी बनविले तर किती संसार फुलतील. किती आशिर्वाद, शुभार्शिवाद तुमच्या पाठीशी मिळतील याची मोजदाद करता येणार नाही. त्यांनी अर्ज आणायचे त्यांनीच भरायचे त्यांनीच सारे काही करायचे. दिखावा आपण का करायचा ...! न्यायालयाने फटकारले अन फ्लेक्स जवळ जवळ बंद झाले आणि ते खर्चिक ही होते. त्यामुळे कार्यकर्ता सोशल मिडिया सारख्या प्रभावशाली प्रसारमाध्यमांचा आसरा घेऊ लागला. मला याबाबत इतकेच म्हणायचे आहे की, आपल्या पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचायला हव्यात. ज्यांना खरोखर गरज आहे त्या गरजवंत मोबाईल वापरत असतील का....! जर वापरत असतील तर सोशल मिडिया सारखं साधन त्यांच्याकडे उपलब्ध असेल का ....! यासाठी कार्यकर्ता हा गोरगरीबांच्या घरी गेला पाहिजे किंवा वस्ती, विभागामध्ये एखादे टेबल टाकून ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले तर या योजना घरादारापर्यंत पोहचतील.त्यामुळे कार्यकर्ता घरोघरी जाईल लोकांशी सुसंवाद वाढेल.
विभागपातळीवर किती निराधार मंडळी आहेत. त्यातले संजय गांधी निराधार योजना मध्ये किती लाभार्थी आहेत. कुणाला दोष देणे गैर आहे, पण माणसं आपल्याकडे येत नाहीत तर आपण माणसाकडे जावे अन त्यांना प्रोत्साहित करावे.समाजाची सेवा करताना अहंमपणा सोडायला हवा. हल्ली किती तरी आपल्या माय भगिनी पोळी भाजीचा व्यवसायात मन रमवू लागल्यात.कोणी कारखान्यातून घरी कामे आणतात आणि उदरनिर्वाह करतात. भाजीचा धंदा करतात. काल एका घरात जाने झाले. त्या छोट्याश्या घरात बरीचशी मंडळी राहत होती पुरुष एकच पण महिला अधिक, त्या घरात एक वृध्दा अंथरुणाला खिळून आहे.आजाराने कृश झालेली पाहिली जेमतेम तिचे वजन केले तर दहा किलोही भरणार नाही.किलकिल्या डोळ्यांनी पांघरूनातून पाहत होती. मनाला वेदना झाल्या. त्यांना गरज आहे आपल्या मदतीची.
मध्यंतरीच्या काळात कोणत्या तरी निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीसाठी काही कार्यकर्ते घरोघर फिरत असताना दिसले. बरं वाटले मनाला. कार्यकर्ते पक्षासाठी काम करणारे पाहतो पण तेच जर गरजवंताना हवा असलेला कार्यकर्ता अपेक्षित आहे. ‘ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के’ असं म्हणताना समाजाची दशा आणि दिशा ठरविताना सर्व सामान्यांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता हवा आहे. आपण एखादी योजना सांगायची अन ती लोकांपर्यंत पोहचत नसेल तर त्याला काय अर्थ आहे का...! घरादारात ज्याला कार्यकर्ता म्हटले जाईल तो कार्यकर्ता. हल्ली व्यावसायिक आणि दिखावा करणारा कार्यकर्ता अधिक प्रमाणात दिसून येतो. सतरंज्या अंथरल्यानंतर आणि व्यासपीठावर माईक खुर्च्या ठेवल्यानंतर ऐटीत स्थानापन्न होणारे, फर्डा भाषण देणारे, भाषण करताना फोटोग्राफर कडे हळूच तिरकस नजरेने पाहणारे अन काय भारी पोझ देत टाळ्या मागणारे कार्यकर्ते दिसतात. अशा या कार्यकर्त्यांच्या वृती अन गुणांना सलामच नव्हे तर साष्टांग दंड्वंत घालायला हवा. कार्यकर्त्याचे कार्य अंधारात प्रकाश तेवत ठेवणाऱ्या पणती प्रमाणे हवे. निराश मनोवृत्तीचा कार्यकर्ता नको. जनमानसाने कार्यकर्ता कसा असावा कोणी विचारले तर अमुक अमुक माणसासारखा असावा किंवा या पक्षातील कार्यकर्त्यासारखा असावा. असं म्हटले गेले तर आपण अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाहीत. 


अशोक भेके

लोकप्रतिनिधी असे ही ..........!



             


     मागच्या आठवड्यात  ‘दैनिक  शिवनेर  मध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते . मुंबईतील वरळी भागातील सेनेचे आमदार  सुनील शिंदे यांनी मुंबई सारख्या शहरी भागात आपल्या स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करीत कॉलेज समंत करून घेतेले. यानंतर छानश्या प्रतिक्रिया उमटल्या.  विशेष अभ्यासक्रम यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना विभागाबाहेर आधार घ्यावा लागत असे. प्रवेशप्रक्रियेसाठी  आमदारांना धावणे आलेच. पण धडपड करून त्यांनी त्यांच्या विभागासाठी आणलेली कौतुकाची वेल समृध्द केल्याशिवाय राहणार नाही. लोकप्रतिनिधी असा असावाहे मी तरी कौतुकाने म्हणेन. ग्रामीण आणि शहरातील शिक्षण सम्राटानी मांडलेल्या शैक्षणिक बाजाराला किंचितसा लगाम….!                     
सध्या सर्वच स्तरातून सोशल मिडीयावर गणपत ( आबा) देशमुखांच्या बाबत फार कौतुकास्पद लिहिले जात आहे. अलौकीक व्यक्तीमत्व .... लोकप्रतिनिधी  कसा असावा यांचे उदाहरण. पैसा खर्च न  करता निवडणुकीत दणदणीत मताधिक्याने भला माणूस १२ वेळा विधिमंडळात निवडून आला. सलग ९ वेळा म्हणजे एकूण ४५ वर्षे नगरसेवक पद भूषविलेल्या वरळीच्या मणिशंकर कवठे विषयी आजही समस्तांच्या मनात अभिमान जागृत होतो. डोंगराएवढं काम करून या माणसांनी मी केलं. कधी म्हटले  नाही.  पूर्वी लोकप्रतिनिधी ज्येष्ठअनुभवीआणि साधारणत: नागरिकांच्या सुखदु:खाशी एकरूप आणि समरस होत असत. त्यांचेही समाजकारण आणि संस्थात्मक राजकारणात लक्ष असे. मंडळाचा अध्यक्ष सचिवही  कोण असावा याचा बारीकसारीक विचार करीत असत. कारण संस्था कारभारात स्वच्छ व  पारदर्शकता हवी आणि त्यासाठी त्या संस्थेवर आस्था असणारी माणसे असायला हवी. हे धोरण मनात असे. आपली नेमकी कर्त्यव्ये काय आणि नागरिकांना आपल्याकडून काय अपेक्षी आहेयाची जाण होती. गावपातळीवर अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत कीप्रचार न  करता निवडून येतात. मतदार प्रचार करून तन मन धन अर्पून निवडून आणतात. त्यांच्या योगदानाचीत्यांच्या कार्याची  पोचपावती मतदार स्वखुषीने बहाल करतात.  बॅ. नाथ पैमधु दंडवतेरामभाऊ म्हाळगीबापूसाहेब काळदातेमृणालताईसुधीरभाऊ जोशीहेमचंद्रगुप्तेप्रमोद नवलकरबी. डी. झुटे,केशवराव धोंडगेअहिल्याताईयांच्यासारखे सज्जनचारित्र्यवानप्रामाणिक लोकप्रतिनिधी  अव्वल दर्जाचे संसदपटू वर्तमानकाळात दिसत नाहीत.
               आजचे लोकप्रतिनिधी असं का करीत नाहीत. ठळक दिसणारे काम त्यांच्याकडून का होत नाहीत. केवळ घरगल्ल्या दुरुस्तीरस्ते डांबरीकरणकुठेतरी रस्तोरस्ती शेड बांधायच्या अन वाचनालयाचे स्वरूप द्यायचे. ही कामे म्हणजे भविष्यात कोणी नांव काढणार नाही. आपल्या एका कामाने हीच पिढी काय भविष्यातील पिढीने देखील नांव काढले पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना काय हवं काय नको...! असे विषय विचारात घेणे अगत्याचे आहे. एक लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात काय  करू शकतो. त्याच्या मनाला हवं तसं चित्र बदलू शकतो. आपल्या विभागात शुभ मंगल कार्यालय याची गरज आहे का ...मेरी मर्जीनुसार हवं तसं लुटणाऱ्या मंगलकार्यालयाविषयी काय प्रतिपादन करायचे. भटजीपासून आचारी आणि तत्सम विविध गरजा लक्षात ठेऊन चालविलेल्या एकाधिकारशाहीविषयी.... हॉल पाहिजे असतो सोबत ते सांगतील त्या दरानुसार आपण आपली गरज म्हणून बोकांडी बसून घेतो. माझ्या विभागात तीन जमाती नवीन आल्या. मंदिरसमाजमंदिरहॉल  निर्माण झाले. आम्ही मात्र कोरड्या पाषाणाप्रमाणे  पाहत राहिलो. आज मुंबईत प्रत्येक विभागात कॉलेज दिले तरी कमीच आहे. आज मुंबईतील मुले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण घेत आहेत.माजोर शिक्षण सम्राट मंडळीना दणका देण्यासाठी स्थानिक विभागवार कॉलेज निर्मिती केली तर किती खर्च वाचेल याचा अंदाज कोणी घेतला आहे का....महापालिका शाळा ओस पडत चालल्या आहेत. शालेय वास्तूत हॉल निर्मिती करता येऊ शकते. पालिकेचा महसूल वाढू शकतो. विचार करायला काय हरकत आहे.
                        निवडणुकीच्या काळात आपल्या पाठीराख्यांसमवेत सातत्याने दिसणारे आणि निवडून आल्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्या,कार्य अहवालदिनदर्शिका प्रकाशनदिवाळीत उटणे वाटपया सारख्या तत्सम कार्यक्रमापुरते राबणारेधडपडणारे लोकप्रतिनिधी अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एका विभागात एका लोकप्रतिनिधीने हेर मंडळ नेमले आहे. कोणी बांधकाम सुरु केले कीसाहेबांच्या कानावर बित्त बातमी पोहचवायची. साहेब संबधितांना सांगून नोटीस काढीत. शेवटी नागरिक साहेबांकडे विभागीय कार्यकर्त्याला हाताशी धरून जात असे. मधल्यामध्येच खिचडी तयार होई अन बांधकाम तोंडी परवाना बहाल केला जात असे राजकीय उत्कर्ष आणि दबदबा निर्माण करण्यासाठी विभागवार असं  केले  जाणारच. यामागची कारणे म्हणजे आजची पिढी. त्यांना विभागाचा विकास नको असतो. त्यांना केवळ साहेबांकडून डोनेशन हवं असतं. गोविंदा असो वा गणपतीनवरात्र असो वा दिवाळी साहेबांनी या वेळेस काही तरी चांगलं दिले पाहिजे. साहेबाना देखील हेच हवं असतं. लोकप्रतिनिधींचा तरुण वर्गाला
आकर्षित करण्याचा एकमेव धंदा,
कामं करण्याऐवजी वाटा चंदा...!
हे पण तात्पुरत्या काळापुरते मर्यादित असते. निवडणुकीत अधिक  माया देणाऱ्या उमेदवाराची तळी उचलतात. तो निवडून येवो अगर न  येवो. मतदारसंघाचा विकास येथेच खुंटतो. निवडणुकीत वारेमाप पैश्यांची झालेली उधळण भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आपली काही वर्षे खर्च घालतो अन तो पर्यंत मुदत संपलेली असते.
                        पण आताचे लोकप्रतिनिधी वेगळेच. काही  लोकप्रतिनिधींचा  बडेजावत्यांचं वैभव आठवलं. हा नेता  म्हणजे हाताच्या किमान आठ बोटात अंगठ्यामनगटावर जाडसर ब्रेसलेट,आणि गळ्यात दोरखंडासारखी चैनडोळ्याला ली भारी दिसणारा गॉगलदिमतीला सफारी किंवा स्कार्पियो हा त्याचा  ट्रेडमार्कच . सोबत भाई आणि भाऊ म्हणजे सुरक्षिततेचे कवच घेऊण जनमनावर प्रभावी दर्शन घडविणाऱ्या लोकप्रतिनिधी यांचे आजचे रूप किंव करण्याजोगे आहे.
                        आजच्या लोकप्रतिनिधी कडून फार काही नाही पण त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख भविष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जावो. हे अगदी मनापासून वाटते हे मलाच वाटत नाही तर समस्त लोकशाहीनुसार विश्वासाने आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजाला वाटत आहे.

अशोक भेके

आठवणीतील माणसं : शाहीर शंकरराव धामणीकर


       

             घोडपदेव विभागात एक अस्सल  माणिक रत्न म्हणून जुन्या पिढीला  ठाऊक असलेले  शंकरराव धामणीकर. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी गांवात धोंडीबा जाधव यांच्या यांच्या घरात २०.१०.१९१४ साली एक माणिक रत्न जन्माला आले. घरची परिस्थिती फारच गरीबीची. गरीब परिस्थितीशी झुंजत असताना त्यांनी सन १९३२ ला मुंबई गाठली.  चास्कर चाळीतल्या बैठ्या चाळीत त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली.  सटवी  जन्माला घालताना ललाटी भाग्य घेऊन पाठविते. जे ठरविलेले असते ते होत नाही, नियती वेगळेच काही तरी घडविते अन त्याचे नशीब उजळवीते. शंकररावांच्या बाबतीत असचं घडले. आवाज चांगला होते. चुलते रामजी बाबा खंडोबा भक्त होत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जागरण गोंधळ व्यवसाय करू लागले. जागरणातून खंडोबाची पदे, कथाकथन आणि गायन क्षेत्रात त्यांनी जम बसविला. हे पाहून दगडूबाबा साळी यांनी त्यांना  त्यांच्या तमाशासंचात सामील करून घेतले. तेथे  त्यांनी निवेदन, गायन आणि अभिनयाचे धडे आत्मसात केले तीन एक वर्षे त्यांनी त्यांच्या सोबत पायपीट केली अन सन १९३७ साली आपला पारंपारिक जागरण व्यवसाय पुन्हा सुरु केला.
                               पूर्वी जागरणात तीनच माणसं असत एक गाणारा दोन साथीदार ...   पण शंकरराव यांनी आमुलाग्र बदल घडवून आणत किमान ८ माणसांचा संच जमा केला. त्यामध्ये गण, गवळण, पोवाडे, खंडोबाची पदे संभाषणासहित करीत आणि वाघ्याचा पेहराव धारण करीत  श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने  ठिकठीकाणी गात  कार्यक्रम करू लागले. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी जागरणातून पारंपारिक कथांचा आधार घेत खंडोबाचे लगीन, म्हाळसाचे लग्न, गोरक्ष जन्म, हरीश्चंद्र तारामती,सत्यवान सावित्री अशा अनेक नाटिकानी लोकरंजन केले. खेड आंबेगाव जुन्नर आणि मुंबईत सर्वत्र त्यांना निमंत्रणे येऊ लागली. हे करीत असताना शाहीर विष्णुपंत कर्डक यांच्याशी भेट झाली अन शंकररावांना पोवाड्याची गोडी लागली.या नंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची मेजवानी अधून मधून त्यांना मिळत असे. ते  विचार ऐकून भारावून जात असत. सदर विचारांची गाणी पोवाडे तयार करून कलेच्या माध्यमातून लोकरंजनाबरोबर लोक शिक्षणाचे काम केले.काळाबाजार, गुंडगिरी, शेतकऱ्यांची दु:ख, अस्पुश्यता, मंदिर प्रवेश, अधिक धन्य पिकवा, शिक्षणाचे महत्व,दारूबंदी, अंधश्रद्धा आदी विषयांवर पोवाडे, गीत लिहून जनजागृती केली. हे सारे काही करीत असताना लोकांकडून  उत्स्फूर्तपणे दोन सोन्याची आणि किती तरी चांदीची पदके त्यांना भर  कार्यक्रमात बहाल करण्यात आली. केवळ जागरण, गोंधळ आणि लोकनाट्य करीत राहिले नाहीत. सदर कालावधीत फावल्या वेळात त्यांनी गांधींजींचे स्वप्न, जनजागृती, आणि जय मल्हार ‘ ही तीन पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली.
`धामणीकरांच्या ‘बाणु – मल्हारीचं लगीन’ या कथानकावरून इंडिअन नँशनल थिएटर यांनी ‘खंडोबाचे लगीन;  सादर केले. त्या मध्ये सूत्रधार म्हणून भूमिका साकारली. शंकरराव धामणीकर हे नांव सर्वत्र गाजत असताना दिल्लीतील विश्व युवक केंद्र लोकसंगीत अकादमीने खंडोबागीत सादर करण्यासाठी निमंत्रित केले. दिल्लीची वारी झाल्यानंतर आकाशवाणीनी वेळोवेळी कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलाविले. मुंबई दूरदर्शन सुरु झाल्यानंतर धामणीकरांचे खंडोबाचे लगीन आणि हुतात्मा बाबु गेनूचा पोवाडा सादर करून आपल्या कलेला महाराष्ट्राच्या घरादारात पोहचविले. हा माणूस फार मोठा होता. पण समाज ‘जागरण, गोंधळ आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताकडे वेगळ्या नजरेने पाहत असतो. तेच धामणीकरांच्या बाबतीत झाले. इतका मोठा लवाजमा सांभाळताना अनेकांची घरे चालविताना धामणीकर आहे तेथेच राहिले. त्यांचं कितीतरी अप्रकाशित साहित्य, काव्य पडून आहे. त्यापैकी अलीकडेच ‘चौर्य’ या चित्रपटासाठी त्यांचे एक गीत घेतले आहे. येत्या १० ऑगस्ट २०१६ रोजी हा चित्रपट थिएटर झळकेल तेव्हा आपल्याला आपल्या शंकरराव धामणीकरांचे नांव पाहायला मिळेलच.
शंकरराव धामणीकर  हा माणूस म्हणजे घोडपदेवच्या दृष्टीने खरोखर माणिक होते. रत्न अनेक पण रत्नांचा राजा म्हणून माणिक ओळखले जाते. असं हे माणिक रत्न एका छोट्याश्या घरात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या या माणसाचा गौरव होणे उचित आहे.आपल्या ८२ वर्षाच्या जीवन प्रवासात बरेच कमावीत या  मातब्बर गड्याने  २९ ऑगस्ट ९६ ला आपला अखेरचा निरोप घेतला आजही ‘वाघ्या-मुरळी नाचती परोपरी ।  आवडी ऐशी पाहीन जेजुरी’  आणि ‘‘आई अंबाबाईच्या नावानं... उदो उदो मायेचा निजरूप आईचा गोंधुळ मांडला,  उदे उदे ग अंबाबाई गोंधळा ये.... या त्यांनी गायलेल्या गीतांची आठवणीने मन भरून आले आहे. शाहीर शंकरराव धामणीकर आम्हाकडून आपणास भावपूर्ण अभिवादन .........!

अशोक भेके

आठवणीतील माणसं : विजय लोके

 

जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकले नाही. पण ४८ वर्षाच्या अल्पावधीतच मनाला चटके देत जाणे, किती तरी दुःखदायी आहे. मृत्यूवार्ता समजली आणि घोडपदेव परिसरात वायुवेगाने पसरलेल्या वृतान्तावर कुणाचाही विश्वास बसेना. चाहत्यांची अवस्था सैरभैर झाली. धावपळ झाली. शिवसेनेचा उपनेता, शिवसेनाप्रमुखांनी सणसवाडीच्या सभेत यांनाच मानसपुत्राचा दर्जा देऊ केला अन कौतुकभरल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. आठवतो तो क्षण,.... आपला माणूस विजय लोकेसाहेब चिरनिद्रा घेत असल्याचे पाहून मात्र कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. माणसाच्या नशिबी जिने इतके कमी कधीच नसावे. त्यांच्या मृत्यूने विभागपातळीवर नुकसान तर झाले पण त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले. खूप हिम्मतीचा माणूस, वाटले होते आजारपणातून बाहेर येईल पण काळाने घात केला. अशा समाजाभिमुख,राजकारणधुरंधर आणि विचारवंत नेत्याच्या आठवणीने गहिवरून येते, मन व्याकुळ बनते, कृतज्ञतेने भरून येते.
                                             विजय लोकेसाहेब म्हणजे उमदे आणि देखणं व्यक्तिमत्व.जहालमतवादी आणि मवाळमतवादी.राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त. बोलायची लकब आणि वागण्याची पद्धत आणि रुबाबदार युवावस्थेला साजेल असा पेहराव.यामुळे तरुणांचे मन आकर्षित होणे साहजिकच आले. युवाशक्तीला क्रिडाक्षेत्राद्वारे एकत्रित आणून राष्ट्रवादी विचारांचे बीज रोवणारा... हा घोडपदेवचा नायक.आयुष्याच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या कोंडीमुळे ते अवघडले, अडखळले, थोडे बाजूला पडले. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचं दु:खी जीवन त्यांच्या तब्येतीवर परिणाम करून गेले.
कीर्ती करून नाही गेले
ते उगाच जन्मले......
समर्थानी म्हटले. पण कीर्तिरूपे उरले ते आपले विजय लोकेसाहेब .. त्यांनी राजकारणातून समाजकारण केले. किती तरी संकल्प केले आणि पूर्णत्वास नेले. नगरसेवक पद भूषविताना त्यांनी
अनेक सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणली. सत्ताधारी असो वा विरोधकांवर अत्यंत तिखट आणि नेमक्या शब्दात टीका न करता सामाजिक कार्यावर भर देत राहिले.
किती तरी प्रसंग त्यांच्या सहवासात अनुभवले.ते सारेच कथन करणे अशक्य असले तरी घोडपदेवच्या नागरिकांची एक तक्रार कायम असे. डास उपद्रव... त्यामुळे मलेरिया सारखे आजार उद्भवून विभागातील दोन तीन बळी गेल्याने चिंतीत झालेल्या आदरणीय लोकेसाहेबांनी यावर दिवसा धूर फवारणी करून महापालिका आपलेच नुकसान करीत आहे ते त्यावेळी त्यांनी संबधित अधिकार्यांना पटवून दिले होते. तेव्हा संबधितांनी राणीबाग आणि परिसरात रात्रीची धूर फवारणी सुरु केली होती. त्यामुळे अंधारात बाहेर पडणारे उपद्रवी डांस काही दिवसातच कमी होत गेले. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न... आज माझ्या मनावर कोरलेला आहे.
त्यांचे विभागावर सामाजिक ऋण आहेत. या ऋणातून थोडे तरी उतराई होण्यासाठी शनिवार दिनांक २५ जून २०१६ रोजी त्यांच्या नावे होत असलेल्या
कै. विजय लोके चौक या नामकरण प्रसंगी आपण उपस्थित राहून सर्व मिळून मानवंदना देऊ या .......!
२५ जुन हा स्व लोकेसाहेबांचा जयंती दिन आहे

अशोक भेके 

या चिमण्यांनो परत फिरा रे .......!



     एक सिंह आला अन दाणे टाकीत टाकीत गेलादाणे इतके गोड आमच्यासारखे आम्हीही ते दाणे टिपत टिपत त्याच्या मागावर गेलो.जो पर्यंत दाणे गोड लागत होते तो पर्यंत ठीक होते पण नंतर बदल होत गेलाअखेर त्याने दाणे टाकायचे बंद केल हे सांगायचे तात्पर्यम्हणजे ठिकठीकाणी विकासक नावाचा सिंह येतो अन भाडेकरूसारख्या सामान्यांना दाणे टाकून सावज टिपत असतो.  हा प्रकार सर्वत्रचालला आहे . सन २००७ साली पुनर्विकासासाठी बाहेर पडलेल्या जाफरभाई कानजी चाळीतील भाडेकरूविषयी सं घडले .  एकूण ८०पैकी   ते १०  रहिवाशी संत जनाबाई मंडईत स्थलांतरीत झाले तर  १० ते १२ रहिवासी मुंबई सेन्ट्रल येथे स्थलांतरीत झाले . उर्वरीतइकडे तिकडे घर भाड्याने घेऊन राहत आहेतस्थलांतरीत समस्यामुळे बदललेला समाज, बदललेले नाते या सर्व बाबींशी मिळतंजुळतंघेताना किती त्रागा करावा लागतोआज  वर्षे उलटून गेलीविकासक त्यांना झुलवितो आहेसुट्टीच्या दिवशी इमारतीचं काम  ही मंडळीकुठवर आले आहे हे पाहण्यासाठी धपापत्या उराने  येतात अन निराश चेहरा करून परत जातातघर भाडेकरूंच्या स्वप्नातले.....! स्वप्नातइतके रुतून बसले आहे की त्यांना प्रत्येक धक्का , प्रत्येक ठेच मनावर घाव करीत आहेत्यांच्या जखमांच्या गर्भात प्रतिशोध दडलेला नसो.जखम ठणकते आहे . यांच्या जखमेवर फुंकर घालणारी मायेची माणसं हवी आहेतमाणूस बऱ्याचदा  निराश होतोअपयशी झाला स्वत:च्या परिस्थितीला दोष देत असतो शिवाय   आपल्या मनातील स्वप्नांना..!          
                        बघता बघता आमची पिढी निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. लहानपणापासून पाहत आलेलो घोडपदेवच्या जुनाट चाळी,चिंचोळ्या गल्ल्या, पडक्या झडक्या इमारती.  घोडपदेव विभाग अस्ताव्यस्त असलेला . सुधारणा होत गेल्याबैल तबेले होते तेथेमंडई आली.   काही ठिकाणी इमारती झाल्या. मांसमासोळी साठी आपल्या जवळ ठिकाण लाभल्यामुळे घोडपदेवकर विशेषतमहिला वर्गबेहद्द खुश झाला होतत्याही पेक्षा ज्यांनी पूर्वनियोजित कट आखून चलाखीने   गाळे घेतले होते ते तर शंभरपटीने मनातल्या मनात मांडेखात होतेपण ते क्षणिक होतेया मंडईला लागून जाफरभाई कानजी चाळ नावाची मराठी वस्तीएकूण ८० भाडेकरू असलेलीरस्त्यालालागून दुमजली माडी आणि दोन उभ्या रांगेतल्या चाळीरस्त्याला लागून वळणदार  दुकाने...  सुंदर चाळ होतीमाणसं चांगली होतीपणचाळ म्हातारी झाली होतीतिला नटवायचं... सजवायचं होते. त्यातून पुनर्विकास संकल्पनेचा जन्म झाला. अडसर आला तो दुरही झाला. तरीही मोठा अवधी गेला. म्हणता म्हणता ९ वर्षे झाली तरीही तपश्चर्या फळाला येत नाही. नियतीला दोष द्या नाहीतर अजून कश्याला. काही गोष्टी कुणाला जमत नसतील तर  त्यांनी इतरांकडे वर्ग करावयास हव्यात. यामागील कारण ज्यांचे  जोडे झीजताहेत त्यांना ठाऊकआहे संक्रमण शिबिर असो वा ती भाड्याची घरे. घुसमटलेले कोंडवाडे. यांना आवश्यक सोयीसुविधा नसतानाही सामंजस्याने घेताहेत म्हटल्यावर विकासकांनी समजून घ्यायला हवे होते. या भाडेकरुना घर बांधून देतो म्हणजे तो उपकारच करीत असल्याची भावनेची हवा त्याच्या डोक्यात घुसलेली आहे. भाडेकरूंच्या इमारतीबाजुला टोलेजंग टॉवर उभा आहे ना तो तेथील भाडेकरूंच्या जिवावर.... हे विकासकांनी लक्षात ठेवायला हवे.  संक्रमण शिबिरात राहणारे एक ठिकाणी वसलेले असले तरी भाडेतत्वावर राहणारे किमान ६० भाडेकरू दर अकरा महिन्यांनी खोल्या बदलताहेत. आजच्या काळात १२ ते १५ हजार घरभाडे सुरु असताना या विकासकाकडून तुटपुंज्या भाड्यावर समाधान  का मानायचे...? आता तर त्याने कहरच केला. घरभाडे देणेच बंद केले. व्यवस्था कमालीची खिळखिळी झाली असल्याने भाडेकरूंचे अस्तित्व क्षुल्लक झाले आहे. न्याय आहे त्या साठी कायदेशीर वाटा आहेत पण काही बाबतीत नाक दाबून... कपाली बुक्का लावण्याचा वापर करावा, ही राजकीय नीती आहे . भलेभले नेते याच मार्गाने मोठे झालेत. विकासक आणि तत्सम घरभाडेकरू यामध्ये सकारात्मक दृष्टीकोनाने निर्णय होत नाही तो  पर्यंत तरी आतुरतेने वाट पाहणारा भाडेकरू प्रतीक्षा करीत राहील.
                             जाफरभाई कानजी चाळीतील रहिवाश्यांसारखी अनेक ठिकाणी असं  घडतंय न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या भाडेकरूना.  १० ते १५  वर्षे उलटूनही आपल्या हक्काचं घर त्यांना मिळत नाही ही शोकांतिका कुणाला सांगायची......? भिकीबिडी चाळगेली आज तेच भाडेकरू  जेथे म्हाडाने वसविले तेथेच स्थायिक  झाले आहेतत्यांना परत यायचे नाहीअसं समजू यापण जाफरभाईकानजी चाळीतील   वर्ष जगण्याच्या संघर्षात गुंतलेल्या सामान्यांना आपले हक्काचं घर कधी मिळणार...?  चिमण्या आपल्या गावची वेसओलांडून गेल्या असल्या तरी ‘ या चिमण्यानोपरत फिरा रे......!’ अशी भावनिक साद कोणी घालील का ...?  त्यांच्याविषयी मायेचा ओलमनातून आपल्या खरोखर ओसरलेला आहे का....?  योगेश्वरचे रहिवाशी आले... श्रीकापरेश्वर कृपाचे रहिवासी आलेआपल्या हक्काच्याघरात राहत आहेत.आनंदी आहेतचाळ संस्कृती लोप पावली असली तरी हक्काच्या घरातील मजा आनदाने घेत आहेतजाफरभाई कानजीचाळीतील अनेक पार्थ असतील पण सारथ्य करणारांनी आपल्या रथात या चिमण्यांना लवकरात लवकर  आसरा द्यावाहे मनोमन वाटतआहे.
                                                                                                                                                                                       अशोक भेके