जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकले नाही. पण ४८ वर्षाच्या अल्पावधीतच मनाला चटके देत जाणे, किती तरी दुःखदायी आहे. मृत्यूवार्ता समजली आणि घोडपदेव परिसरात वायुवेगाने पसरलेल्या वृतान्तावर कुणाचाही विश्वास बसेना. चाहत्यांची अवस्था सैरभैर झाली. धावपळ झाली. शिवसेनेचा उपनेता, शिवसेनाप्रमुखांनी सणसवाडीच्या सभेत यांनाच मानसपुत्राचा दर्जा देऊ केला अन कौतुकभरल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. आठवतो तो क्षण,.... आपला माणूस विजय लोकेसाहेब चिरनिद्रा घेत असल्याचे पाहून मात्र कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. माणसाच्या नशिबी जिने इतके कमी कधीच नसावे. त्यांच्या मृत्यूने विभागपातळीवर नुकसान तर झाले पण त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले. खूप हिम्मतीचा माणूस, वाटले होते आजारपणातून बाहेर येईल पण काळाने घात केला. अशा समाजाभिमुख,राजकारणधुरंधर आणि विचारवंत नेत्याच्या आठवणीने गहिवरून येते, मन व्याकुळ बनते, कृतज्ञतेने भरून येते.
विजय लोकेसाहेब म्हणजे उमदे आणि देखणं व्यक्तिमत्व.जहालमतवादी आणि मवाळमतवादी.राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त. बोलायची लकब आणि वागण्याची पद्धत आणि रुबाबदार युवावस्थेला साजेल असा पेहराव.यामुळे तरुणांचे मन आकर्षित होणे साहजिकच आले. युवाशक्तीला क्रिडाक्षेत्राद्वारे एकत्रित आणून राष्ट्रवादी विचारांचे बीज रोवणारा... हा घोडपदेवचा नायक.आयुष्याच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या कोंडीमुळे ते अवघडले, अडखळले, थोडे बाजूला पडले. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचं दु:खी जीवन त्यांच्या तब्येतीवर परिणाम करून गेले.
कीर्ती करून नाही गेले
ते उगाच जन्मले......
समर्थानी म्हटले. पण कीर्तिरूपे उरले ते आपले विजय लोकेसाहेब .. त्यांनी राजकारणातून समाजकारण केले. किती तरी संकल्प केले आणि पूर्णत्वास नेले. नगरसेवक पद भूषविताना त्यांनी
अनेक सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणली. सत्ताधारी असो वा विरोधकांवर अत्यंत तिखट आणि नेमक्या शब्दात टीका न करता सामाजिक कार्यावर भर देत राहिले.
अनेक सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणली. सत्ताधारी असो वा विरोधकांवर अत्यंत तिखट आणि नेमक्या शब्दात टीका न करता सामाजिक कार्यावर भर देत राहिले.
किती तरी प्रसंग त्यांच्या सहवासात अनुभवले.ते सारेच कथन करणे अशक्य असले तरी घोडपदेवच्या नागरिकांची एक तक्रार कायम असे. डास उपद्रव... त्यामुळे मलेरिया सारखे आजार उद्भवून विभागातील दोन तीन बळी गेल्याने चिंतीत झालेल्या आदरणीय लोकेसाहेबांनी यावर दिवसा धूर फवारणी करून महापालिका आपलेच नुकसान करीत आहे ते त्यावेळी त्यांनी संबधित अधिकार्यांना पटवून दिले होते. तेव्हा संबधितांनी राणीबाग आणि परिसरात रात्रीची धूर फवारणी सुरु केली होती. त्यामुळे अंधारात बाहेर पडणारे उपद्रवी डांस काही दिवसातच कमी होत गेले. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न... आज माझ्या मनावर कोरलेला आहे.
त्यांचे विभागावर सामाजिक ऋण आहेत. या ऋणातून थोडे तरी उतराई होण्यासाठी शनिवार दिनांक २५ जून २०१६ रोजी त्यांच्या नावे होत असलेल्या
कै. विजय लोके चौक या नामकरण प्रसंगी आपण उपस्थित राहून सर्व मिळून मानवंदना देऊ या .......!
कै. विजय लोके चौक या नामकरण प्रसंगी आपण उपस्थित राहून सर्व मिळून मानवंदना देऊ या .......!
२५ जुन हा स्व लोकेसाहेबांचा जयंती दिन आहे
अशोक भेके
No comments:
Post a Comment