समस्त घोडपदेव करांचे कुलदैवत श्री कापरेश्वर महाराज रडत आहे....! कुणाला खोटं वाटत असेल , पण सत्य घटना आहे . एकदा मंदिरात जा आणि बाबांच्या मूर्तीकडे निरखून पहा. ते बाबांचे डोळे .....! बाबांची हनुवटीखाली जखम ...! डोळ्यापासून तोंडापर्यंतचा चीर पडलेला भाग. वेदनांनी तळमळतोय आपला बाबा...! साऱ्या भाविक भक्तांच्या वेदना आपल्या शिरावर घेऊन बाबांचा चेहरा अत्यंत विद्रूप झालेला आहे. छिद्र पडलेली आहेत. त्या छिद्रात मुंग्यांची रांग लागलेली दिसेल. डोळ्याच्या छिद्रातून मुंग्या( किटक कृमी) बाहेर पडताना पाहून आम्ही त्या बाबांचे कार्यकर्ते असल्याची लाज वाटते. बाबांच्या एकाग्रतेचा भंग झाला आहे.... भंग झाला भावनांचा... पावित्राचा भंग झाला आहे....! त्या दगडाला केशरी रंग लावून प्राणप्रतिष्ठित केलेला आपला देव आहे. सुख, समाधान आणि शांती मिळविण्याकरिता त्या शक्तिमान स्वरूप बाबा जवळ आपण लीन होतो.... त्या जागृत शक्तीस्वरूप अस्तित्वाला अभिवादन करायला आपण त्या गाभाऱ्यात जातो...... त्याच गाभाऱ्यात खदखदत आहे आपला कापरीबाबा. त्याच्या मनात काय चालले असेल. भक्ताला पाहून हसणारा बाबा आज खिन्न मनाने रडून सांगत आहे.*कधी काळी रूप ऐसे चांदण्यासारखे...***गाभाराही उजळे....***आज देह झाला खडतर,**घुसमटे जीव माझा.....**एकांत हवा,**मज एकांत हवा* *दु:ख माझे व्यक्त करावया**मज एकांत हवा*या विभागाने श्रीकापरेश्वर बाबाला कुलदैवत म्हणूनच स्वीकारले आहे. त्यामुळे बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नाचा कण गीळकृत न करणारा असंख्य भाविकवर्ग आपण पाहत आहात. त्यांच्या श्रद्धा आहेत. तुमचं आमचं श्रद्धास्थान. बाबांचा गाभारा म्हणजे त्या सुवासिक वातावरणात शिरताच त्या आनंदी लाटा सतत आनंद देतात. तो आनंद चैतन्य स्वरूप असतो.तो सर्वासाठी असावा म्हणून कीटक कृमिनी तेथे आपले संसार थाटले आहेत. याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी आज विषय हाताळताना कुणाच्या श्रद्धेला हात घालत नाही. घरच्या देव्हारातल्या चांदी पितळी देव प्रतिमेमध्ये साधं पाणी गेले तर आपले घरातले आजाराच्या विळख्यात सापडतात. माणूस हैराण होतो. कापरीबाबा म्हणजे आपले कुलदैवत. आज विभागात असंख्य मंडळी आजारी आहेत. बुद्धीजीवी वर्ग हे मानणार नाही. हा एक मनाच्या विश्वासाचा प्रश्न आहे. पण माझ्या कापरेश्वर बाबांचा भक्त नक्कीच यावर विश्वास ठेवील. अपार श्रद्धा आहे अनेकांची. त्यांनाही दिसतेय हे वाईट आहे पण कोणीही चकार शब्द बोलत नाही. ज्याने आपल्याला भरभरून दिले, त्याच्यासाठी आपण काही नाही करायचे मग कुणासाठी करायचे. याला खर्च नियोजन म्हणायचे की, पैश्याची काटकसर....? काही वर्षापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात असं भगवान व्यंकटेश्वराच्या हनुवटीला तडा गेल्याचे स्पष्ट दिसत होते. व्यवस्थापनाने हे गंभीरतेने घेतले. त्यावर त्यांनी मूर्तीला चंदनाचा लेप लावला. तो बरेच दिवस ठेवला. काही दिवसांनी तो लेप काढला तेव्हा त्या ठिकाणी महालक्ष्मी मातेची छबी दिसू लागली. त्यामुळे आजतागायत भगवंताला चंदनाचा लेप लावतात.मनाची एक धारणा होऊन बसली आहे, कोणती तरी शक्ती आपल्या उर्जा देत आहे. शक्ती देत आहे. गुलमोहराकडे पाहिले तर ते हिरवेगार झाडांवर रंगीबेरंगी फुले कशी उमलतात...? निसर्ग म्हणा वा ईश्वर. मात्र परिणाम दृश्य वा अदृश्य स्वरूपात जे सतत घडतात ते मान्य करावयास हवे. तात्पर्य सांगायचे म्हणजे भक्तांच्या भावनेशी कोणी खेळू नये. या विषयाशी निगडीत माझ्याकडे बरंच काही लिहिण्यासारखे आहे . यथावकाश मी लिहू शकतो. पण सध्या नको. खरं तर मी *अविस्मरणीय गांधी सप्ताह,** *प्रजा फौंडेशन आणि आपले* *नगरसेवक,**या विषयावर लिहिण्याचा मानस होता. पण विभागातील काही तरुणांनी ज्यांना श्री कापरेश्वर महाराजांविषयी, बाबांविषयी आस्था आहे ,त्यांनी मला लिहिण्यास सांगितले. घाईघाईत लिहिले आहे, चुका झाल्या असतीलही. बाबांचा शुभार्शिवाद माझ्या सदैव पाठीशी आहे. तसा आपल्याही पाठीशी आहे.
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment