Saturday, September 8, 2018

*कौतुकास्पद श्रावणमास सोहळा*



शुभ मंगल सावधान.....! मंगलाष्टक सुरु झाली अन ती लगीनघाई बघायला मिळाली. हराडेरा घेऊन विठानानी (कोंडे)  उभ्या होत्या तर आकांक्षा थोरात कुरवली बनून डोक्यावर कलशतांब्या घेऊन उभी होती. प्रकाश भट्ट, सीताराम महाबरे यांची मंगलाष्टक.. काही कुरवल्या, वरबाप आणि वरमाय, माता  मोबाईलवर विवाहसोहळ्याची क्षणचित्रे टिपण्याच्या गडबडीत होत्या. विशेष म्हणजे विवाहासाठी रुखवत सजवला होता, तो नेत्रात टिपण्यासारखा होता. लग्नाला आलेल्या महिलांनी आपल्या रंगीन साड्यांमुळे वातावरणात रंग भरला होता.  प्रमोद भट्ट यांची विवाहप्रसंगी गायलेली गीते, टाळ मृदुंगाच्या ठेक्याने लक्षवेधी ठरली. आज मंदिरात भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी माता विवाह सोहळा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. अतिशय सुंदर... विवाहदृश्य वातावरण होते.
श्रावण महिन्याच्या प्रारंभी श्रीकापरेश्वर मंदिरात सुरु झालेला श्रावणमास ज्ञानसत्र सोहळा आदरणीय ह भ प  *श्री कैलासमहाराज चव्हाण* यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत गीतेचे अभ्यासपूर्ण विवेचन दररोज कानावर पडते. अत्यंत श्रवणीय असते. बोलणं असं कि समोरच्यांची मने सहज जिंकणारा, विचार असे कि जाणारा येणारा ते ऐकण्यासाठी क्षणभर थांबत असतो. सध्याच्या धावपळीच्या व्यस्त जीवनात अशा कार्यक्रमाना उपस्थिती कमी असते. पण ऐकणारे अधिक असतात. मंदिरात घंटा वाजते पण तिचा नाद जेथे थांबत नाही तो पसरत पसरत इतरत्र जात असतो. म्हणून हे सत्र लोकांपर्यंत पोहचत असते. कापरेश्वर मंदिरालाच पंढरी समजून आपल्या श्रोत्यांमध्ये विठ्ठलाचे रूप बघणाऱ्या आणि अखंड ज्ञानदान करणाऱ्या कैलासमहाराजांचे व्रत हीच त्यांची एकादशी आहे. मंत्रमुग्ध करणारे विचार जोपासणारा एक प्रतिभावंत..!
चांगल्या कामाचे कौतुक करायला हवेच. जो चांगले करील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याइतुके मोठेपण नसले तरी खुल्यामनाने कौतुक जरूर करीत आहे. ह भ प दत्ताशेठ डुंबरे, ह भ प बाळासाहेब हांडे यांच्या कार्याची दखल घेण्याजोगी आहे. श्रीकापरेश्वर मंदिरात सध्या आध्यात्मिक वातावरण जोपासले गेले आहे. ते केवळ या उभयतांमुळे....! *घोडपदेव समुह*  त्यांना वंदन करीत आहे. *हा कार्यक्रम असे समजते कि महिलांच्या योगदानामुळे होत आहे.*  छान महिलां घरसंसार करून या मंदिराच्या धार्मिक कार्यात उतरत असतील आणि शोभा वाढवीत असतील तर त्यांना देखील लाख लाख धन्यवाद
अशोक भेके
घोडपदेव समूह

No comments:

Post a Comment