
एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून
जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही
लोक राहात होते. पण त्याला
हटकण्याची हिमंत कुणामध्ये नव्हती.एक जन हिमंत करून म्हणाला,
'अरे,
तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ
होईल ना ?'
तेव्हा कोळी
म्हणाला,
'तुला रे काय करायचे,
हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत,
म्हणून मी करणारच.' तात्पर्य म्हणजे काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्याचे नुकसान झाले तरी ते पर्वा
करीत नाहीत. अनेकजण स्वार्थापोटी नागरिकांचे हाल करीत असतात. तेव्हा
त्यांच्या कृत्यांना लगाम घालणारा माणूस लोकांना अपेक्षित असतो. पण तो हिम्मतबाज
माणूस कोण असेल तर *श्री दिलीप वागस्कर*
यांचे नावं सहजगत्या समोर येईल. या वर्षी येत्या ७ ऑक्टोबरला त्यांचा *सुवर्णमहोत्सवी वाढदिवस* असल्यामुळे
थोडीफार चर्चा होणारच. चर्चा कोणत्याही गोष्टीवर होते, फक्त निमित्त हवे असते.
आतापर्यंत आपण पूर्वजांची थोरवी सांगताना वर्तमानकाळात डोकावण्यासाठी मेंदू तडफडत होता.
चर्चेतील माणसं लिहिताना हे भरून निघाले.
*सौ. वत्सलाबाई आणि श्री. रघुनाथ वागस्कर* या कष्टकरी कुटुंबियांत,
मुंबई राणीबाग येथील वाणी चाळ येथे
जन्माला आलेले *श्री. दिलीप वागस्कर* यांच्याविषयी थोडेसे रेखाटन करताना एका
मध्यमवर्गीय माणसाची अकारण स्तुती करीत नाही पण जे चांगले आहे त्याचे कौतुक
करायलाच हवे. भायखळा बाजारात व्यवसाय करीत कृतार्थ आणि कष्टमय जीवन जगत सारे काही
आलबेल असताना नियतीने पदरात टाकलेले दु:ख म्हणजे पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे
सदैव नम्र असलेल्या पत्नी *नम्रताचे* अचानक सोडून जाणे, कल्पना करता येणार नाही.
एक करुण, हळवी किनार, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्कीच ओले करते. आतवर कुठेतरी
हेलावून टाकते. पण आपल्या चिल्यापिल्या कडे पाहत नव्या उमेदीने समाजात उभे राहिले.
सौम्य प्रकृतीचा सडपातळ माणूस. गळ्यात विविध प्रकारच्या सोनसाखळया ही त्यांची ओळख
पुरेशी आहे.
एक काठी असेल आणि कोणत्याही आधाराविना ती उभी करायची असेल
तर ती उभी राहणार नाही. दोन काठ्या उभ्या राहणार नाहीत. पण तीन तिकाटने उभे केले
तर त्या काठ्यांना एकत्रितपणाचे बळ प्राप्त होईल, हे श्री वागस्कर यांनी हेरले आणि
सर्वाना बरोबर घेऊन हुतात्मा बाबु गेनू नगरात अस्ताव्यस्त पडलेल्या अडचणीची
एकत्रित मोळी बांधून सोडविण्याचे काम करीत आहेत. अंधार होता तेथे प्रकाशमान दिवे
आले. शौचालय पडझड झाली होती तेथे दुरुस्ती झाली. शौचालयाला जाणाऱ्या महिलांच्या
सुरक्षेसाठी CCTV बसविण्यात आले. २१ कुटुंबियांना दरमहा पुरेल इतके अन्नधान्य वाटप.
घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्याच्या घरात पितळी समई वाटप. विद्यार्थी गुणगौरव, गेली
आठ दहा महिने झाले. विविध लोकोपयोगी उपक्रम पाहतो आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक
दिवशीय सहल. शैक्षणिक, क्रिडा क्षेत्राशी निगडीत अनेक स्तुतीजन्य कार्यक्रम.. हा
माणूस नुसता झपाटलेला आहे. सतत काम करीत असल्यामुळे सध्या चर्चेत आहे. सध्या चर्चेत असलेले व्यक्तिमत्व. अनेक कारणांनी हे नावं
सध्या चर्चेत आहे. पुनर्विकास रखडलेल्या हुतात्मा बाबू गेनू नगर परिसरातील रहिवाशी बांधवांनी चांगली गोष्ट साध्य
करण्यासाठी तप केले असावे म्हणून त्यातून जे फळ मिळाले ते *श्री. दिलीप वागस्कर*
यांच्या रूपातून दिसत आहे. ते करीत असलेल्या कार्याने आजतरी अनेक कुटुंब त्यांना
दुआ देत आहेत. *घोडपदेव
समुह* अशा मनी दानत असलेल्या माणसाची कृतज्ञता व्यक्त करीत
आहे.
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment